ॐ दत्त चिले महाराज

🌺🌺 ॥ ॐ दत्त चिले महाराज ॥ 🌺🌺

प. पू. चिले महाराजांचा जन्म १५ आगस्ट १९२२ ला आजोबा श्री बु-हाण यांचेकडे पन्हाळ्याजवळच्या जेऊर गावी झाला. त्यांचे तिर्थरूप कोल्हापूरला व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे गाव पैजारवाडी हे होय. त्यांचे बालपण त्यांच्या गावी पैजारवाडी येथेच गेले. त्यांच्या बालपणी ते अनवाणी वा-याच्या वेगाने पळत असत. पहाणारे अचंबित होत असत. त्याना भैरवनाथ मंदीर, मसाईमंदीर, टेबलाईमातामंदीर व सिध्देश्वर मंदीरात जाण्यात व तेथेच वेळ घालवण्यात जास्त आवडत असे.

ज्या ज्या वेळेस संत महंत लोकांमधे वावरत असताना सभोवतालच्या लोकांना त्यावेळी ते कोणी वेगळे आहेत का? हे जाणवतही नाही.लौकिकार्थाने हे सत्पुरूष पृथ्वीतलावर जन्मल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे वर्तन करतात. श्री चिले महाराजांचे पहिले गुरू श्री गराडे महाराज. त्यांचेकडे फुले गंध कापूर यांची अगदी लहानपणी सेवा केली. गराडे महाराज प्रसन्न झाले व म्हणाले,‘बाळा, कोल्हापूरला माझे गुरू श्री सिध्देश्वर महाराजांकडे जा. सिध्देश्वर महाराज व पाटील महाराज हे माझे गुरू आहेत.’

धनकवडीचे अवलिया संत श्री शंकर महाराज यांना तर ते आपले थोरले बंधू (दादा) मानीत. त्यांची वागणूक पेहराव अत्यंत साधी असे. त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा समृध्दीचा देखावा कधीच केला नाही. भक्त लोक तसेच परिचितजन नेहमीच अचंबित होत असत. ते अत्यंत माफक पण अतिशय मुद्देसूद बोलत असत. ते एकाशी बोलत पण इतरांना संदेश मिळत असे. सदगुरूंनी त्यास कृपांकित करून त्यांचे जीवन परिपूर्ण केले.

श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरूष. त्यांनी अवतार काळात कोल्हापूर सातारा नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले.

त्यांची समाधी पैजारवाडी येथे आहे. हे स्थान पन्हाळ्याच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे. त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रिती होती म्हणऊन कासवाच्याच आकाराचे समाधी मंदीराचे बांधकाम केलेले आहे.   मात्र त्यांचे अवतार कार्य संपल की, सर्वांना त्यांची जाणीव होऊ लागते. त्यावेळी लोक त्यांनी लिहीलेले किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लिखाणातुन काही गोष्टी जाणू लागतात. अशांची समाधी असेल तर समाधी दर्शनही घेतात. या पैकी एक आहेत दत्तचिले महाराज!

चिले महाराजांची कर्मभुमी पुणे, पण त्यांची समाधी मात्र रत्नागिरी कोल्हापुर रस्त्यावर पैजारवाडी या लहानशा गावात आहे. त्यांचा जन्मदेखील पैजारवाडी येथेच झाला. पण जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहीले. सुकुमार वयात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली. त्यांना काही काळ अन्नपाण्याशिवाय काढला. कधी कधी दहा ते बारा दिवस उपवास घडत असे. त्याही अवस्थेत त्यांनी भ्रमंती सुरुच ठेवली. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची गुढता असे. ते लोकांना ब्रम्ह म्हणजे काय? हे समजावून सांगत. कधी कधी "मीच ब्रम्ह आहे" किंवा "मीच दत्त महाराज आहे" असे लोकांना सांगत. सर्वच भक्तांना ते एकासारखी वागणुक देत असे. १९८५-१९८६ च्या दरम्यान पैजारवाडी येथे समाधिस्थ झाले.

              🌺🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🌺

Post a Comment

0 Comments