🌺🌺 नामस्मरणाचे सामर्थ्य ओळखा 🌺🌺
"श्रीपाद श्रीवल्लभ" हे भगवंताचे नाम चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे असेच आहे. कोणतीही मदत न घेता, हे भगवंत "श्रीपाद श्रीवल्लभांचे" नाम बसल्या जागीच सर्वकाही मिळवून देते. सगुण भक्तीच्या नामातूनच निर्गुणाची गोडी उत्पन्न होत जाते. नामस्मरण करीत केलेले सर्व कर्म ‘अकर्म’ होते; म्हणजेच त्याचे फळ तयार होत नाही. एरवी कोणतेही कर्म करताच त्याचे, पाप किंवा पुण्य असे फळ निर्माण होत असते.
नामधारकाच्या कुळाला यमधर्माचा स्पर्श होऊच शकत नाही; म्हणूनच भक्त प्रल्हाद मरणाच्या प्रत्येक दाढेतून सुखरूप बाहेर पडत असे! नामाने भगवंताचे सगुण रूप आपल्या समोर साकारू लागले की, ‘नाम’ साधना सिद्ध झाली असे समजावे. खूप नामस्मरण झाले की, परमेश्वराला आपल्या भक्तासामेर सगुण रूप घेऊन प्रकट व्हावेच लागते; म्हणूनच दगडी खांबात विष्णूचा ‘नरसिंह अवतार’ प्रकट होऊ शकला. प्रल्हादाचे नाम सगुणातून निर्गुणापर्यंत पोहोचल्याची ती पोचपावती आहे.
सद्य:स्थितीत हरविलेला परमात्मा त्याच्या या नामसाधनेतून शोधून काढता येतो. ध्रुवबाळाने याच नामसाधनेच्या क्रियेतून परमेश्वर शोधून काढला. अनेक संतांनी हाच प्रयोग करून ईश्वराचे दर्शन, सत्संग, सोबत यांचा अनुभव घेतलेला आहे. नामस्मरण साधल्याचे हेच पुरावे आहेत.
आपण केलेली पापे आणि पुण्ये ही ज्याची त्याला भोगावीच लागतात. परंतु नामामध्येच फक्त पापांच्या राशी जाळून टाकणारी शक्ती आहे. ही शक्ती दुसर्या कोणत्याच साधनात नाही; म्हणूनच ‘नामसाधना सर्वश्रेष्ठ’ ठरते. सर्व संतांना हे आध्यात्मिक रहस्य माहिती असल्याने, ते सर्व या नामाचीच कास धरतात आणि आम्ही मात्र हे सोपे साधन सोडून देतो आणि पूजा, अर्चा, पाठ, पारायणे, यज्ञ, आरत्या, उपवास, अनुष्ठाने, स्तोत्रे भजने, धार्मिक ग्रंथांचे वाचन यातच अडकून बसतो. या सर्व साधनांपेक्षा हजारो पटीने फायदा करून देणारे ‘नाम’ मात्र आम्ही घेत नाही. मग ईश्वराने, तरी तुम्हाला का मदत करावी ?
‘नाम घेतला आणि वाया गेला’ असा मनुष्य दाखवून द्या! नामाने जळणार नाही, असे पापच मनुष्य करू शकत नाही. कसेही घेतलेल्या नामाचे सुद्धा फळ मिळतेच! ( पाप नाहीसे होणे) विस्तवावर जसा श्रद्धा असो वा नसो पाय पडताच चटका बसतोच अगदी तसेच नामस्मरणाचे तंत्र आहे; म्हणूनच वाल्याचा ‘वाल्मीकि ऋषी’ होऊ शकला. वाल्याने केलेली सर्व पापे नामाने धुऊन टाकलीत. नामसाधनेचे वेगळेच सामर्थ्य व फलप्राप्ती असल्याने, सर्व संतांनी नामस्मरणाचा गौरवच केलेला आहे.
म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे "श्रीपाद श्रीवल्लभ" या भगवंताच्या नामाचा आधार घ्या दुसऱ्याच्या आधाराची गरज लागणार नाही

0 Comments