श्री गुरुदेव दत्त

अत्यंत वेगाने पसरणारी विषाणूंच्या आजाराची साथ आलेली असताना काय करावे ? चिंताक्रांत मुद्रेने आमचे मित्रवर्य विचारविनिमय करत होते . खरतर या विचारावर एकमेव उत्तर म्हणजे स्वतःला संसर्गापासून दूर ठेवणे . अर्थात याचा भर ओसरेपर्यंत काही दिवस घरी राहणे . पण या उत्तरावर ते म्हणाले ,अहो आचार्य नित्य सर्व गोष्टी सकारात्मक घ्या म्हणता तर आता या परिस्थितीत काय सकारात्मक करणार आहात ते सांगा .
मी म्हटले ,खरतर दत्त महाराजांनी हि संधी सर्व दत्त भक्तांना दिली आहे असे समजायला हरकत नाही ,साथ आटोक्यात आणायला घरी राहून सहकार्य करणे हा मुद्दा तर आहेच पण सहज मिळणाऱ्या संधीने गुरुचरित्राचे सप्ताह या ठिकाणी होऊ शकतात . अनेक ग्रंथांचे वाचन होऊ शकते ,या प्रसार माध्यमाद्वारे लेखन होऊ शकते . आणि यातून दत्त महाराजांच्या लीलांचे स्मरण करत महाराजांना प्रार्थना करू कि हा संसर्गजन्य आजार दूर करून पुन्हा नृसिंहवाडीला आपले दर्शन घडू द्या . निश्चित ते कृपा करतील आणि हे संकट दूर करतील यात शंका नाही .
आता तुम्ही म्हणाल कि असे ठाम कसे म्हणू शकता तर भक्तवत्सल दत्त महाराज हे भक्तांच्या प्रेमात कायम बद्ध आहेत . या साथीने दत्त भक्त नृसिंहवाडीसारख्या स्थानी जाऊ शकत नाहीत , आम्ही जसे दत्त महाराज्यांच्या आठवणीत आहोत तसेच ते देखील जास्त काळ आमची वाट पाहत थांबणार नाहीत ,हा रोग तातडीने आटोक्यात आणून म्हणतील ,आता गेला तो रोग ,ये बरं माझ्या भेटीला नृसिंहवाडीला !! श्रीगुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य


Post a Comment

0 Comments