II श्री स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत II अध्याय - ४

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय - ४
कुरवपुरला वासवांबिकेचे दर्शन
श्री पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही तिघेही ध्यानाला बसलो. त्याआधी पळणी स्वामी म्हणाले “बेटा माधवा, वत्सा शंकरा, आपण तिघेही आता ध्यानाला बसू. ध्यानात जो अनुभव येईल त्यावर चर्चा करावी, अशी श्रीवल्लभांची आज्ञा आहे. याचा अर्थ भविष्यात आपल्याला काही तरी विशेष आध्यात्मिक अनुभव येणार असतील. आजचा दिवस शुभयोगांनी युक्त असलेला उत्तम दिवस आहे (२५-५-१३३६) व आपल्या जीवनात मोठा वैशिष्टयपूर्ण दिवस आहे. मी आज स्थूल शरीराला इथेच सोडून सूक्ष्म रूपाने कुरवपुरला जाणार. एकाचवेळी सूक्ष्म रूपाने चारपाच ठिकाणी जाऊन विहार करणे ही माझी सहज क्रीडा आहे. आत्ता आपण श्रीपादांचे ध्यान करु. श्रीपादांची आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरवपुरला जाईन.''
स्वामी अनुग्रहाची सुलभता
पळणी स्वामींचे बोलणे ऐकून मी त्यांना विचारले, “स्वामी माधवाने सूक्ष्म रूपाने श्रीपादांचे दिव्य दर्शन घेतले. तुमचाही सूक्ष्म रूपाने श्रीवल्लभांशी संबंध येतो. मी मात्र त्यांचे नावच ऐकले आहे. त्यांचे रूपही बघितलेले नाही. तेव्हा मी श्रीपादाचे ध्यान कसे करु?'' पळणी स्वामी हसत म्हणाले “श्रीपादांवर भक्ती असली की सर्व काही सिद्ध होते. कासवी दुरुनच आपल्या विचार तरंगांनी आपल्या पिल्लांचे रक्षण करते. मांजर पिल्लांना तोंडात धरून त्यांचे रक्षण करते. तसेच श्रीपाद आपल्या भक्तांचे कूर्माप्रमाणे व मार्जाराप्रमाणे रक्षण करतात. काही काळ साधना झाल्यानंतर मर्कटकिशोर न्यायाने भक्तांचे पालन होत असते. याचा अर्थ परिपक्वता येताच माकडाच्या पिल्लांप्रमाणे भक्तांनाच गुरुला धरुन ठेवावे लागते. त्यानंतर साधना वृद्धी होऊन परिपक्व झाले की मासे व त्याचे पिल्ले जशी स्वतंत्रपणे वावरतात (मोठा मासा पुढे, पिल्ले मागे) तसे भक्त गुरुच्या मागे वावरतात. तू ध्यानाला बसल्यानंतर तेच तुला दर्शन देतील. श्रीवल्लभ भविष्याचा काही प्रमुख निर्णय घेणार असतील म्हणून त्यांनी मला सूक्ष्मरूपाने कुरवपुरला बोलावले असेल. काहीतरी उत्तम घटना घडणार असतील, असे सांगून ते ध्यानस्थ झाले. मी व माधव पण ध्यानाला बसलो. आम्ही सुमारे १० घटका ध्यानस्थ होतो, एकाच वेळी आमचे ध्यान संपले. ध्यानानंतर पळणी स्वामी फारच उत्तेजित दिसले. मी व माधव त्यांना त्यांच्या ध्यानात आलेले अनुभव सांगण्याची प्रार्थना करु लागलो. मंदस्मीत करीत ते सांगू लागले.
शिवशर्माची गाथा - श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ
या कलियुगातील लोक मोठे भाग्यवान! कुरवपुर हे छोटेसे बेट आहे. तेथे श्रीपादांचे माहात्म्य जाणणारे एक वेदज्ञ ब्राह्मण राहत. त्यांचे नाव शिवशर्मा व त्यांच्या बायकोचे नाव अंबिका. कुरवपुर गावात राहणारे ते एकच ब्राह्मण कुटुंब, ते यजुर्वेदी असून त्यांचे गोत्र काश्यप होते. उपजीविकेसाठी शिवशर्मा नदी ओलांडून पलीकडच्या काठी जात व ब्राह्मणोचित गावातले कार्य करून पुन्हा बेटावर येत. त्यांची संताने अल्पायुषी असायची. त्यातूनच एक मुलगा कसा बसा वाचला तर तो ही नेमका मंद बुद्धीचा होता. मुलाच्या चिंतेने ते कृश होऊ लागले. एके दिवशी श्रीपादांसमोर वेद पठण केल्यानंतर ते उदासपणे उभे होते. त्यांच्या मनातले भाव जाणून श्रीपाद मंदस्मित करीत म्हणाले, “शिवशर्मा, इतर गोष्टी विसरून निरंतर माझेच ध्यान करणा-याचा मी गुलाम असतो. तुझी व्यथा व इच्छा मला सांग.'' ''
शिवशर्मा म्हणाले “स्वामी माझा मुलगा माझ्याही पेक्षा महान पंडित व विद्वान होईल अशी माझी अपेक्षा होती, पण तो मंद व जड बुद्धीचा आहे. तुम्ही घटिताचे अघटित करण्यास समर्थ आहात. त्याला पंडित व विद्वान बनविणे तुम्हाला अशक्य नाही. यावर तुमची इच्छा!'' ''
श्रीपाद म्हणाले “बेटा कुणालाही त्याचे प्रारब्ध कर्म सुटत नाही. सृष्टी आपल्या अनुल्लंघनीय नियमाप्रमाणेच चालत असते. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून पती मिळतो, दान केले असता संतती मिळते. दान मात्र सत्पात्री करावे. दान घेणारा सत्पात्र नसेल तर अनिष्ट संभवते. सद्बुद्धी नसणा-याला अन्नदान केले तर त्याच्या पापी कर्मातील पापी अंश अन्नदात्याकडे येतो. दान अहंकार रहित होऊन करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते. पूर्व जन्म कर्म दोषामुळे तुझा मुलगा मंदबुद्धीचा आहे. तुम्हाला अल्पायुषी पुत्र नको होता. तुम्हाला पूर्ण आयुषी पुत्र हवा होता तो मिळाला. त्याचे पूर्व जन्म पाप नाहीसे करून त्याला विद्वान पंडित करावयास कर्म सूत्रानुसार तुला तुझे उरलेले आयुष्य त्याला द्यावे लागेल.'' वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवशर्मा, आपले उरलेले आयुष्य देण्यास तात्काळ तयार झाले. ते म्हणाले “स्वामी माझा मुलगा बृहस्पती प्रमाणे विद्वान वक्ता व्हावा हीच माझी इच्छा आहे. यापेक्षा मला काय हवे?'' ''
श्रीपाद म्हणाले “ठीक आहे. काही दिवसातच तू मृत्यु पावशील. मृत्यूनंतर तू सूक्ष्म देहाने धीशिला नगरात(शिर्डीत) निंबवृक्षाच्या तळाशी असलेल्या भूगर्भात तपश्चर्या करशील. काही काळानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशात जन्म घेशील. मात्र ही गोष्ट तू तुझ्या पत्नीला देखील साँगू नकोस''
श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावीजन्माचा निश्चय (आविष्करण)
थोड्या दिवसातच शिव शर्मा वारले. अंबिका मुलाला घेऊन भिक्षा मागत जगू लागली. आजूबाजूचे लोक अवहेलना करीत. ते सहन न होऊन तो ब्राह्मणपुत्र आत्महत्या करण्यास नदीकडे धावत निघाला. ते असह्य होऊन त्याची आई अंबिका “बाळा असे नको करु' म्हणत त्याच्या मागे धावत होती. नशीब बलवत्तर म्हणून श्रीपाद रस्त्यात भेटले. त्यांनी त्या मुलाला आत्महत्येपासून परावृत्त केले. अपार करुणेने त्याच्यावर दृष्टीपात करताच तो मुलगा क्षणभरात महान पंडित झाला. अंबिकेला त्यांनी आपले शेष जीवन शिवपूजेत घालवायला सांगितले. पुढच्या जन्मी श्रीपादांसारखा मुलगा तिच्या पोटी जन्माला येईल, असा तिला वर दिला. खरे तर तिन्ही लोकात त्यांच्या समान कुणीच नसल्यामुळे, स्वतः तिच्या पोटी जन्म घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. .
वासवी अवतरण व चरित्र
माझ्या सुयोगाने मी श्रीपादांसोबत कृष्णानदीत स्नानाला गेलो. स्नान झाल्यावर श्रीपादांनी आत्मशक्तीने योगाग्नी प्रज्वलित केला. त्या योगाग्नीतून अद्भुत अग्निवर्चस्वी कन्यकांबा अवतरली. मी अनेक दिवसांपासून श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यकांबाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न ध्यानात करत होतो पण तसे झाले नव्हते. आज प्रत्यक्ष प्रकट झाल्यावर मी अंबिकेला साष्टांग प्रणिपात केला. मंदस्मित करणारे श्रीपाद अतिप्रसन्न जाणवले. श्रीवासवी माता साक्षात श्रीपादांसारखी हुबेहुब दिसली. दोघांना बघणा-यांना ते जुळे आहेत असा भास होत होता.''
श्री कुरवपुर महाक्षेत्रात श्रीपाद, वासवीमाता व माझ्या शिवाय कोणी नव्हते. श्रीपादांच्या योगलीला अनंत आहेत. धिशिला नगरी कुठे असेल. विगतजीव शिवशर्मा केवळ सूक्ष्म देहाने तपश्चर्येत राहणे कसे साध्य आहे असा मी विचार करीत होतो. श्रीवल्लभ अचानक म्हणाले, “योगशक्ती अनंत आहे. दत्तप्रभूचे योगमार्ग बहुचित्र विचित्र, नित्य नूतन, अपूर्व, अचिंत्य आहेत.''
थोड्या वेळाने योगाग्नीतून दिव्य वर्चस्वी दंपत्तीचे ‘‘अवतरण झाले. ते कौसुंबी, कुसुम श्रेष्ठी नावाचे श्रीवासवी माताचे जननी, जनक होते असे, श्रीपाद म्हणाले. श्री वासवीमाता थोडा वेळ ध्यानस्थ झाल्या. श्रीवल्लभांनी आपल्या योगशक्तीने प्रज्वलित केलेल्या योगाग्नीतून श्रीनगरेश्वर स्वामी अवरतले. नंतर श्री वासवीमातेचे सहोदर विरुपाक्ष, अग्नि प्रवेश झालेले १०२ गोत्रज गोमठांना अवतरीत केले. श्रीवल्लभ प्रसन्नतेने म्हणाले. विरुपाक्ष नंदीश्वर अंशानी जन्माला आलेला आहे. त्यात माझा अंश पण मी निक्षिप्त केला आहे. ''
सूर्यमंडलातून श्रीशैल मल्लिकार्जुन लिंगात शक्तिपात करणारे आमचे आजोबा बापन्नावधानी, पूर्वजन्मी भास्कर नावाने बृहत शिलानगरीत राजगुरु होते. ते ब्रह्मदेवाच्या अंशाने जन्माला आले. श्रावण शुद्ध पौर्णिमेला नक्की मी बृहतशिलानगरीत येणार. माझी बहीण श्रीवासवी कन्यकांवा माझ्या हाती राखी बांधणार. बेटा ! पळणी ! माझे अवतार कार्य, लीला, महिमा, निरंतर साध्य असतात. इतर त्याचे अनुकरण सुद्धा करु शकत नाहीत, माझ्या शक्तीपण इतरांना लाभणे अशक्य. तुझ्या कठोर तपस्या फलरूपात सिद्धवैश्य दर्शन, वासवीमाता दर्शन, माता-पिता कौसुंबी, कुसुम श्रेष्ठीं दंपत्तीचे दर्शन लाभले. आपण आता असलेले कुरवपुर हे भव्य स्थान होणार आहे, त्याचे दर्शन घ्या. .
अमोघ, आश्चर्य ! क्षणभरात महाप्रसादाची संकल्प मात्रात निर्मिती झाली. रत्नखचित सिंहासनासह आम्ही सगळे त्या प्रांगणात होतो. .
श्रीचरण अशा रीतीने सांगू लागले ‘‘गोमठ ६१४ गोत्रज पैकी अंबिकेत अग्नि प्रवेश करणारे १०२ गोत्रज मात्र होते. स्वारोचिमनु काळात ईश्वराला धारादत्त झालेल्या १८ गावांचे प्रधान गाव, बृहत शिलानगर आहे. दत्तभक्त तुम्ही किंवा कुणीही बृहतशिलानगरात अंबिकेचे, नगरेश्वराचे, इतर देवतांचे दर्शन केल्यास विशेष फल सिद्धीलाभ होतो. दत्तनाम स्मरण जेथे होते, तेथे अदृश्यरूपात वासवीमाता निवास करते. अभीष्ट सिद्धी देते. जेथे वासवी कन्यकांबाचे नामस्मरण होते, तेथे दत्तात्रेय गुप्तरूपात निवास करतात. स्वल्प श्रमानेही विशेष फल प्राप्ती मिळते. कृतयुगात मनुष्य सत्यसंकल्पी, सिद्ध संकल्पी होतो. त्रेतायुगात यज्ञ, याग आदि कृत्ये विशेष व्हायचे. व्यापार युगात मंत्रशास्त्र प्रचार झाला.या कलियुगात तंत्र शास्त्र प्रामुख्यता विशेष होणार. तंत्र म्हणजे चैतन्य विस्तार. या समस्त सृष्टीचे मूलभूत तत्व मीच आहे. ३३ कोटी देवी देवता, समस्त जीव, अनेक कोटि ब्रह्मांड माझ्यातच आहेत. माझ्यामुळेच चैतन्यवंत होऊन, माझ्या अंशांमुळेच विविध शक्ती प्राप्त करतात. सर्व नद्या जशा सागरात जाऊन मिळतात, तसेच कुठल्याही देवतेची केलेली आराधना मलाच पोहोचते. माझी आराधना ही समस्त देवीदेवता आराधना समान फलदायी आहे. माझ्या परब्रह्मतत्वातून जगद्रूपात दर्शित होणारे केवळ माझे प्रतिबिंबच आहे. मी व माझे प्रतिबिंब अभेद आहे. आदिपराशक्ती रूपात असणारा मीच. परतत्व, स्त्री पुरुषत्वाच्या अतीत आहे. माझे पुरुष रूप दत्तात्रेय तर स्त्री रूप आदि पराशक्ती. म्हणूनच आगमवेत्ता पण श्रीकृष्ण श्यामलादेवी, श्रीराम ललिताबिका म्हणतात. माझे स्थूलरूपी किरण, माझा स्थूलरूप संचार प्रदेश पवित्र करतात. माझे सूक्ष्म शरीर या पृथ्वीवर व्याप्त आहे. माझे कारण शरीर कोटी कोटी ब्रह्मांड व्याप्त आहे. माझे महाकारण शरीर, सच्चिदानंद स्वरूपी ब्रह्मानंद अनुभवत विश्वातीत असते. या चारही शरीरात माझे चैतन्य एकाच काळात अस्तित्वात असते. कुठलेही ज़प, तप,योग प्रक्रियानी किंवा इतर कुठल्याही विधि विधानानी कुणीही मला प्राप्त करू शकत नाही. केवल अनुग्रह विशेषानीच मी प्राप्त होऊ शकतो. माझ्यात लीन झालेले पुण्यात्मा त्या त्या संदर्भानुसार माझ्या संकल्पानुसार, स्थूल शरीराने अवतरून माझी संकल्प पूर्ती करतात. ''
परब्रह्मतत्व
त्रिशक्ति स्वरूपिणी अनघालक्ष्मी, माझीच शक्ती स्वरूपिणी आहे. माझ्या शरीरात वाम भागात असणारी अनघालक्ष्मी व उजव्या भागात त्रिगुणात्मक माझे त्रिमूर्ती स्वरूप, समस्त सृष्टी माझ्यातच आहे. सृष्टि - स्थिति - लय - तिरोधान, अनुग्रहासारखे कार्य निरंतर होत असते. प्रत्येक पदार्थ घनीभूत अक्षर स्वरूप आहे. सर्व अक्षर स्पंदनशील असतात. सर्व अक्षर मंत्रस्वरूपच, स्पंदनशील असलेले नादस्वरूपच महासरस्वतीरूप, घनीभूत शक्तीच महालक्ष्मी स्वरूप, त्यातले निक्षिप्त शक्तिस्वरूपच महाकाली स्वरूप आहे. या क्षणी शक्ती झालेला मी पुढल्याक्षणी शाक्त व या क्षणी शाक्त मी पुढल्याक्षणी शक्ती. जगन्माता अपार कृपाळू व जगन्नियंता कठोर दिव्यन्यायाचे प्रतीक आहे.माझे पितृ स्वरूप थोड्या कर्मापासून होणारे कठोर फल देण्याचे कार्य करते. शरणागत भक्तावरती कृपा माझ्यातल्या मातृस्वरूपामुळे होते. खुप चुका केल्या तरी आई कमीच मानते. थोड्या पुण्याचे जास्त फलप्रसाद आई देते. या समस्त सृष्टीचा माता, पिता, गुरु स्वरूप मीच हे ओळख. तुझ्या मनातले संशय निवारण पण करणार आहे. श्रीवासवीमाता माझी सहोदरी कशी झाली ही तुझी शंका. पूर्वी अत्रि अनसूयाचा पुत्र झालो होतो तेव्हा पाळण्यात झोका देताना “सगळी मुलेच झाली. दत्ताच्या रूपाची, एकही मुलगी झाली नाही!'' असा विचार अनसूयेने केला. ती महापतिव्रता असल्यामुळे, तिचे मनोसंकल्प तीव्र असल्यामुळे लगेच फलदायी झाले. पाळणा एकीकडे जाताना दत्ताचे रूप व परततांना वासवीचे रूप दिसे. स्वप्न की वैष्णवी माया अशा विचारात असतानाच, तिथे अत्रि महर्षी आले. ते म्हणाले “अनसूया! त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचे मूळ खरे तत्व काय कसे असणार, यावर कठोर तपस्या करून दत्तात्रेयाला पुत्ररूपात प्राप्त केले. तिन्ही मूर्तीचे मूळ रूप, गुरूस्वरूप हे जाणलो. हेच श्रीमन्नारायण स्वरूप. हेच स्वरूप स्त्री रूपधारी झाल्यास आदिपराशक्ती कन्यारूपात असते. ते दोघेही सृष्टी आधीपासून भाऊबहीण रूपात आहेत. आहा! काय आश्चर्य!'' असे सांगून थोडावेळ ध्यानस्थ झाले. माझे कूटस्थ चैतन्यच यथार्थ जाणले. तसेच अंबिकाचे स्वरूप पण जाणले. भविष्य काळात मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्याच्या, आधी योगमाया अवतरण्यास वासवी कन्यका रूप धारण करण्याचा निर्णय ते समजू शकले. अत्रि अनसूयेच्या इच्छेप्रमाणे दोघांचे रूप वेगळे नसून, ते दत्ताचे नारी रूप आहे. म्हणून अंबिकाने मला राखी बांधली. अत्रि अनसूयेचा कुमाररूपी दत्तच, कलियुगातले श्रीपाद श्रीवल्लभ रूप होय. .''
सर्व दत्त अवताराचे हे प्रथम रूप गुप्त राहणार. आदि पराशक्ती अवताराचे प्रथम अंबिका रूपच ही कन्यकांबिका, म्हणून तिला पण अग्निस्वरूपात गुप्त ठेवले गेले. मनुष्यधर्म वेगळे, दैवीधर्म वेगळे. अंबिकेचे दिव्यमंगल रूप दर्शन होण्यास महापुण्य प्राप्त व्हावे लागते. आज तुम्हा सर्वांना बोलवण्याचे कारण आहे. अनंत चैतन्य स्वरूपी मी नामरूपात बंदी नाही. म्हणून माझे अनंत चैतन्य, सागर तरंगरूपात उठून निश्चल स्थितीत राहू इच्छित आहे. साकारात असो की निराकारात, मला फरक नसल्यामुळे हे रूप आजच गुप्त करु इच्छितो, अगो वासवी! तुझी इच्छा, अभिप्राय सांग.' असे श्रीपाद म्हणाले. श्रीपादांचे रूप इतक्या लवकर गुप्त होणे, मला बाधाजनक वाटले. दिव्य मंगल स्वरूपिणी श्रीवासवी माता प्रार्थनादृष्टीने श्रीवल्लभांकडे पाहून म्हणाली. “परमपूजनीय सहोदर! कल्लोळ तरंगरूपात, निर्विकारात व्यत्यास नसल्यास, अनंत कल्याण गुणात्मक असे हे श्रीपाद श्रीवल्लभ रूप थोडे काळ झाल्यावर गुप्त करावे व हे दिव्यमंगल रूपाने खच्या साधकासाठी दर्शन द्यावे. हे स्वरूप देश कालादि भेद नसून स्थूल दृष्टीला गोचर होईल, अशा रीतीने गुप्त होऊ देत. तुला अवतार घेण्याचा संकल्पच असेल तर दुसरा शरीर धारण करु शकतोस. हवे असल्यास हे शरीर समाधिस्थ असताना, त्या समाधीतून भक्तांवर कृपा करु शकतोस.
नरसिंह सरस्वती व स्वामी समर्थ जन्म संकल्प
समस्त कल्याणकारी आदिशक्तीला उद्देशून श्रीपाद म्हणाले “हे वासवांबिके, तुझा संकल्प खरा ठरो! मी अजून १४ वर्षे म्हणजे ३० वर्षाचा होईपर्यंत या देहात राहील. नंतर काही काळ अदृश्य होऊन, पुन्हा संन्यास धर्म उद्धारासाठी नृसिंह सरस्वती नावाने अवतरेन. ८० वर्षे संचार करून कदली(दलदलीच्या) वनात गुप्त होईन. तेथे ३०० वर्षे तपोमग्न राहून प्रज्ञापुरात(अक्कलकोट) स्वामी समर्थ नांवाने अवतार पूर्ण करीन. कधी अवधूत रूपाने, कधी सिद्ध पुरुष रूपाने माझ्या अपार दिव्य लीला दाखवत लोकांना धर्मानुरक्त करेन'.
विदेशींना स्वामींचे अनुग्रह व नामकर
श्रीपाद थोडा वेळ ध्यानस्थ होऊन विरुपाक्षला बोलावून म्हणाले, “बेटा! विरुपाक्षा! एक आंग्ल (श्वेत) जातीय माझ्या दर्शनार्थ अनेक कष्ट सोसून कुरवपुरला पोहोचलेला आहे. हे स्वर्णमय प्राकार इतरांना गोचर नसल्यामुळे, तो मला या बेटात शोधत आहे. तू त्याला इथे घेऊन ये.'' ह्या सर्वांना दुर्गम प्रांतात श्वेत (आंग्ल) जातीय कसा काय आला? याचे आश्चर्य वाटले. विरुपाक्षानी त्याला आणले. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेताच, त्याने खूप आनंदाने ओक्साबोक्सी लहान बाळासारखा रडत श्रीचरण पकडले. श्रीपादांनी त्याला उठविले. त्यांच्या नेत्रद्वयातून करुणामृत वाहत होते. अनंत शक्ति, अनंत प्रेममूर्ती, दिव्यभव्य असे त्यांचे स्वरूप होते.त्यांचे हृदय कोटीकोटी मातृप्रेमाची मूर्ती होते. श्रीवल्लभांनी त्याला “जॉन''असा संबोध केला. ते जॉनच्या डोळ्यात बघू लागले. जॉनला नेत्रदीक्षा देत आहेत की काय असे वाटले. थोड्या वेळाने त्याच्या भृकुटीवर स्पर्श केला. त्या पवित्र स्पर्शाने तो दिव्यानंदात तल्लीन झाला. तितक्यात सगळ्यांना आकाशात बघायला सांगितले. दिव्यमय तेजानी आकाशात देवनागरी लीपीत एक संख्या दिसली. ती संख्या चित्रगुप्तांची ज्ञानसंख्या आहे अशी ओळख सांगितली. ती संख्या येत्या शतकात अती प्रमुख गणांक होणार असे श्रीपादांनी सांगितले. १७०१४११८३४६०४६९२३१७३१६८७३०३७१५८८४१०५७२७ ही विश्वसंख्या. याचा अर्थ अंतरार्थ पदार्थतत्व शोधणा-यास, परार्थ पदार्थतत्व शोधणा-यास त्यांच्या त्यांच्या स्थायी नुसार अवगत होणार असे श्रीपाद म्हणाले.
श्रीपाद तेलुगुत बोलत असत. जॉनला मात्र ते समजत असे. जॉन जर्मनी भाषेत विचारायचा, श्रीपाद तेलुगुत उत्तर द्यायचे. किती आश्चर्यकारी विषय हा ! श्रीपादांच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण लीलान्वित, महिमान्वित असतो. समस्त ज्ञान विज्ञान श्रीचरणी आश्रित असतात. श्रीचरण असे सांगू लागले. “मी तेलगु भाषेत बोलताना, जॉन मात्र जर्मनी भाषेत समजतो. माझी वाणी त्याला जर्मनी भाषेत अनुवादित होते. मी माझ्या भक्तांसाठी न करु शकणारे असे कार्यच नाही, वाहू न शकणारा भार नाही, परिहार न करु शकणारी. समस्या नाही. सर्व धर्म परित्याग करुन त्रिकरण शुद्धीनी माझ्या वर विश्वास करणारे सदा धन्य होत. माझ्या वात्सल्य प्रसादाने प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्यात श्रेयोदायी रूपात स्पंदित होईल. ते तुम्ही प्रमाण रुपात स्वीकारु शकता. या चतुर्दश भुवनात मला पाहिजे असे काही नाही. तुम्ही स्वधर्म पालन करीत, माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो. मी प्रेमस्वरूपी आहे, मला फक्त प्रेमानी जाणू शकता.
सप्तर्षी मंडलात धृव प्रमुख आहे. धृवाला धृवदेवता कशी प्राप्त झाली ते जाणा. केवळ पित्याच्या मांडीवर बसण्याच्या इच्छेनो श्रीमन्नारायणासाठी तप केले होते. श्रीमन्नारायणाच्या दर्शनानंतर त्याची ती इच्छा पूर्ण झाली. श्रीमन्नारायणानी त्याला धृवपद दिले इतकेच नव्हे तर आपल्या मांडीवर घेतले. पितृप्रेमाने तृप्त झालेला धृव प्रभुच्या मांडीवर विराजला.
कलियुगात धृवच येशुप्रभु
कलीयुगात धृवच ख्रिस्त प्रभु रूपाने जन्माला आला आहे. तो देवालाच आपला पिता मानत असे. ज्या भावनेने तुम्ही मला भजाल, त्या भावनेनेच मी तुम्हाला भेटेल. मरियम रूपी पवित्र आत्म्याला श्री वासवी कन्यकांबानी आपली शक्ति प्रदान केली. मरीयमच्या कन्या अवस्थेतच धृव येशू रूपाने जन्माला आला. येशु माता पिता संयोगाने जन्मलेला नाही. येशु वारंवार माझा पिता म्हणावयाचा, तो श्रीमन्नारायणच, तुमचा समोरचा श्रीपाद श्रीवल्लभ. सिद्ध वैश्य मुनिंनो ! माझी सहोदरी वासवांबीके समोर तुम्ही वेदगान करा. तुमच्या पवित्र वेदघोषामुळे येत्या शताब्दीत, होणारे दुष्कर्म फल निवारण होईल. वासवांबीकेसहीत श्री नगरेश्वराला वेदघोष अतीप्रिय आहे. आपल्यातील उपस्थित हा श्वेत जातीचा पुढच्या जन्मी हिमालय प्रांतात वेदपंडित कुटुंबात जन्माला येणार. योगी होऊन शंबल गावी परतणार. तुम्ही पवित्र वेदघोषाने कलुषपूरित वायु मंडलातली दुष्ट शक्ती हाकलून काढा.
सिद्ध वैश्यमुनींचे वेदघोष समाप्त झाले. श्री वासवी कन्यकांबिका, श्री नगरेश्वर, विरुपाक्ष, कुसुम श्रेष्ठी दंपती, सिद्ध वैश्यमुनी अग्निकुंडात प्रवेश करून अंतर्धान झाले. श्रीपादांनी जॉनला आशीर्वाद दिला. “श्रीचरणांचे जीवन चरित्र ग्रंथ लिहिला असलेला बरा.'' असे जॉन म्हणाला. येत्या शतकात जॉन्च्या इच्छेप्रमाणे जर्मन भाषेत श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र आविर्भवित होणार असे स्वामींनी सांगितले. जॉनला अभय देत निरोप दिला. मला परत स्थूल देहात प्रवेश करण्यास सांगितले व स्वतः प्रयाग संगमस्नान करावयास निघालो, म्हणत अदृश्य झाले..
बाळांनो! आज २५-५-१३३६, शुक्रवार अती पवित्र दिवस आहे. शंकरा! तुझे ध्यानामधील अनुभव सांग' असे पळनी स्वामींनी आदेश दिला..
“ओ स्वामी! मला एक यवनवेशधारी संन्यासींचे दर्शन झाले. ते अल्ला मालिक!'' वारंवार म्हणत होते. ते निंबवृक्षा खाली बसलेले दिसले. ते १६ वर्ष आयुचे होते. दर्शनासाठी आलेल्यांना ते ‘‘मी नानक पंथी मुसलमान' असे म्हणाले. तसेच “मी भारव्दाज गोत्राचा सद्ब्राह्मण'' आणि “ हे माझे गुरुस्थान, इथे गुरुवार-शुक्रवारला पूजा करणारे भाग्यवान' असेही म्हणाले. स्वामी माझे ध्यान या यवन दर्शनांतच संपले. मला मात्र श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले नाही. ते यवन संन्यासी बसले होते, त्या जागी काही जण खोदू लागले. तेथे एक लहान गुहा होती व तेथे चारी बाजूला दिवे तेवत होते. थोड्या वेळाने ते यवन संन्यासी तेथे येऊन, त्यांनी गुहेचा दरवाजा बंद केला व म्हणाले “हे माझे गुरुस्थान आहे, हे कोणीं उघडू नका. स्वामी! माझे ध्यान असे असण्यात श्रीवल्लभांचे संकल्प काय असावे?'' .
यवनांचे पूर्व वृत्तांत
बेटा! श्रीवल्लभांचे तत्व अचिंत्य तत्व आहे. त्यांची लीला अशीच, असे नक्की सांगता येत नाही. जगातील समस्त धर्म संप्रदायपद्धती, सर्वांचा समन्वय करून त्यात सनातन धर्म मिसळणे हाच त्यांचा संकल्प. कलियुगांतात सनातन धर्म, पूर्ण विश्वात पुन्हा प्रतिष्ठित करणारे तेच ! “यहोवा' म्हणजे “मी आहे'' ते त्यांचे परब्रह्म स्वरूप, विश्वात प्रतिबिंबित सर्व चैतन्य, देवपुत्र भावित ख्रीस्ताचे चैतन्य, शांती, सौख्य स्थिर करणारे प्रवाहरूपी पवित्र स्वरूप, परिशुद्ध झालेले चैतन्य आहे. ते तिन्ही रूप त्यांचेच, निर्मल विशुद्ध प्रेमाने अलभ्य दर्शन भाग्य जॉनला झाले, असे श्रीचरणांनीच सांगितले. तसेच यवन धर्म पण दत्ततत्वात अंतर्भाग आहे हे जाण. “महामति'' नावाचा महात्मा, निराकार मख्खेश्वराचा भक्त. तो देवाला ‘अल्ला' म्हणावयाचा. त्याला सप्त स्वर्ग दर्शन झालेले.त्याला अल्लाला पाहण्याची इच्छा झाली. मुस्लिम फकीराच्या आश्रयात मुस्लिम धर्माचा जाणकार झाला. एका हिंदू महात्म्याच्या शिकवण्याने तो हिंदू धर्म जाणकार झाला. वाराणसी मधे एका महायोग्या जवळ क्रियायोग शिकला. श्रीदत्तांच्या एका अंशावताराचे दर्शन करून सोन्याचे नाणे मागितले. त्याचा गडवा भरेना, तेंव्हा त्या अवधूताने दोन खजूर त्यात टाकले. तो संतुष्ट झाला. अशा प्रकारे दत्त चैतन्याचा त्याच्यात प्रवेश झाला. नंतर ते धीशिलानगरात गेले. ते जंगलातले एक छोटे गाव, संपूर्ण जंगली वातावरण असतांना तिथल्या एक शिळेवर श्रीपाद श्रीवल्लभ ध्यानस्थ झाले. त्यामुळे त्या शिळेवर जे कोणी ध्यान करतील, त्यांना अद्भूत फलप्राप्ती होईल. तू पाहिलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली, भूगृहात श्रीपाद श्रीवल्लभांनी १२ वर्ष तप केले होते. त्या १२ वर्षात, १२ हजार वर्षाचे तपःफल प्राप्त झाले होते. .
श्रीवल्लभांचे शरीर १२ हजार वर्षाचे झाले. त्या गुफेत त्यांच्या जटा पसरल्या. त्यांच्या भुवया दाट झाल्या होत्या. त्यांच्या भुवया उचलून त्याचे डोळे बघावे लागत असत. ते तपःफल श्रीचरणांनी त्या यवन बालसंन्याशाला प्रदान केले. तो बालसन्यासी ४ वर्षाचा होता, तेंव्हा श्रीचरणांनी आपल्या गुप्त रूपात गुहेत तप केले होते. तो बाल संन्यासी १६ वर्षाचा होईपर्यंत १२ वर्षाचे तप पूर्ण करून म्हणाले, “बाळांनो! मी सांगणारी घटना येत्या शताब्दीत होणारी आहे. ही वर्तमान घटना नाही. श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीनृसिंह सरस्वति या नावांनी ८० वर्षे अवतरुन संन्यास धर्माचा उद्धार करण्याचे कार्य करतील. नंतर गुप्त रूपाने कदली वनांत ३०० वर्षे तपोनिष्ठेने राहतील. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नांवाने अवतरून प्रज्ञापूर येथे वास्तव्य करतील. अवतार समाधी नंतर ते श्री शैल मल्लिकार्जुन लिंगात सामावतील. तू पाहिलेले यवन संन्यासी वृद्धावस्थेपर्यंत राहतील. त्यांच्यात श्रीपाद श्रीवल्लभ आपले चैतन्य समाविष्ट करतील व त्यांना आपल्या सारखे करतील..
बेटा शंकरा ! तुला गुहेत दिसलेल्या चार नंदादीपांच्या मधे श्रीवल्लभांनी १२ वर्ष कठोर तपस्या केली. ब्रह्माच्या चार पावलांनी जगाचे १६ भागांत विभाजन झाले. या चार पावलांचे प्रतिक म्हणजेच ४ नंदादीप. ते आपल्या योगाग्नीने प्रज्वलीत करून त्यामधे श्रीपाद तपश्चर्येत राहीले. ब्रह्माची चार पावले म्हणजे प्राकुप्रती दक्षिणोत्तर दिशा होत. त्यातला पहिल्या पादाच्या- पिक् कलेच्या उपासनेमुळे, उपासक प्रकाश, तेज प्राप्त करतो. दुस-या पादाची कला पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, समुद्र आहेत यांची उपासना करणारा दिग्वीजयी होतो. तिस-या पादाच्या कला अग्नी, सुर्य, चंद्र, विद्युत आहेत. यांचे उपासक ज्योतीष्मंत होऊन जगात यशस्वी होतात. प्राण, चक्षु, श्रोत्र, मन या चौथ्या पादाच्या कला आहेत. यांची उपासना करणारे स्वतंत्र होतात. उत्तर दिशेचे विजयी ज्ञानी, दक्षिण दिशेचे विजयी भूत, प्रेत, पिशाच बाधा मुक्त, पूर्व दिशाचे विजयी ऐश्वर्यवान, पश्चिम दिशाचे विजयी, यांना राजेशाही प्राप्त होते. चारी दिशांचे विजयी दिग्विजयी होतील. श्रीपाद दिशावस्त्रधारी होत. सर्व दिशांच्या अनंतत्वात व्याप्त आहेत. म्हणूनच त्यांना दिगंबर म्हटले आहे. श्रीदत्त दिगंबर श्रीपाद दिगंबर आहेत. श्रीचरणांच्या स्थूल-सूक्ष्मकारण शरीरातून हजारो किरण, कला व्यक्त होत असतात. काही किरण अंशावतारात अवतरण घेतात. त्यांचे नियमित कर्तव्य पार पडताच, ते अंशं मूळस्थान श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. ते सृष्टि, स्थिति, लय, तिरोधान, अनुग्रह एकाच वेळी करतात. विश्वसृष्टीत होणारे स्पंदन सृष्टितत्व रूपात, त्याची स्थिति स्थितितत्वरूपात, लय लयतत्वरूपात, ते ते स्पंदन जनक स्थान मूलतत्वात पोहोचण्याला तिरोधान म्हटले आहे व जीवांवरची करुणा, दया त्या संबंधी स्पंदनांना अनुग्रह म्हटले आहे.
कलियुगातील मानव धन्य ! केवळ स्मरण केल्याने दत्तप्रभूची अनुग्रह प्राप्ती
युगबदलामधे मानव हा अल्प शक्तीमंत असतो. म्हणून परातत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या पातळीपर्यंत उतरते. शरीरधारी होऊन प्रभूचे अवतरण होते. हे संपूर्ण अनुग्रह सूचक आहे. अशाप्रकारे प्रभुतत्व खालच्या पातळीत उतरल्यामुळे थोड्या परिश्रमामुळे मानव उत्तम फल प्राप्ती करु शकतो. म्हणूनच कलियुगातील मानव धन्य व भाग्यावान आहेत. कारण त्यांना थोड्या प्रयत्नातच प्रभु सान्निध्याचे सुख प्राप्त होते. केवळ स्मरण करताच त्यांना दत्तप्रभूचा अनुग्रह लाभतो. माणसाला पतित होण्यास जितका वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ अनुग्रह लाभण्यास लागतो हे परम सत्य आहे! स्मरण, अर्चन, कीर्तन अशा नवविध भक्तीने त्याला श्रीप्रभूचे सान्निध्य लाभते. अनन्यभावे शरण आलेल्या भक्तांचे सारे पाप कर्म, दोषयुक्त विषय वासना, वाईट संस्कार सर्व श्रीपाद प्रभूच्या चैतन्यात मिसळून जातात व श्रीपादांच्या दर्शनांपासून श्रेयोदायक शुभ स्पंदने शरणागत भक्तांमधे परिवर्तित होतात. .
श्री चरणाच्या चैतन्यात समाविष्ट झालेले पाप समुदाय, ते पवित्र नदीत स्नान करून किंवा आपल्या योगाग्नीत जाळून भस्म करतात. त्यासाठी स्वतः तप करून त्याचे फळ शरणागतांना देतात. अशाप्रकारे कर्मसूत्राचे अतिक्रमण न होऊ देता भक्तांचे रक्षण करतात. दर क्षणी आपल्या भक्तांचे कर्म ध्वंस करण्यासाठी उग्ररूपात वावरतात. विमुक्तीचा प्रसाद देतात. म्हणून पादुकांना शरण येणारे भक्त नकळतच कर्मबंध विमुक्त होतात.'' .
अशा प्रकारे पळणी स्वामींनी सर्व सांगितल्यानंतर मी माझ्या मनातल्या शंका धीट होऊन विचारल्या “स्वामी, साडेसाती वगैरे परमेश्वरालाही भोगाव्याच लागतात. ही ग्रहबाधा श्रीगुरु कशाप्रकारे टाळतात हे कृपा करून सांगा." .
“बेटा शंकरा! खगोलातील ग्रहांचे जीवांशी मित्रत्व अथवा शत्रुत्व नसते. मानव, जन्माच्या वेळी प्रारब्ध कर्मानुसार तशा ग्रहदशेमधे जन्म घेतो. त्या त्या ग्रहांना अनुसरून त्याला शुभ-अशुभ फळे मिळत असतात व तो तशी कर्मे भोगीत असतो. अशुभ ग्रहांच्या दोष निवारणार्थ मंत्र, तंत्र, यंत्र, योजून फायदा झाला नाही, तर जप, तप,होम यांचा आश्रय घ्यावा. तेही करुन ग्रहबाधा झाली तर त्या अवयवाचे दुखणे सुरु होते. महर्षी विश्वकल्याणासाठी अनेक प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्याचे तपःफल मानवी कल्याणासाठी देत असतात. त्यामुळे विश्वात उत्पन्न होणारी अनिष्ट स्पंदने माणसांना न सतावता, जिथे उत्पन्न झाली त्या मूळ बिंदूतच नाहीशी होतात. तसेच माणसाने जप तप केले तरी या अनिष्ट स्पंदनांची तीव्रता कमी होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे थोडेसे पुण्य कार्य केल्याने विशेष शुभफळ मिळणे ह्यालाच अनुग्रह म्हणतात. .
बेटा, क्रियायोग सिध्दांताप्रमाणे सृष्टी-स्थिती-लय-तिरोधान अनुग्रह विवरण तुला सांगितले. आता तू तुझ्या ध्यानात असताना काय बघितलेस? ते सांगून त्याचे स्पष्टीकरण मी करत आहे. तू ज्या मुस्लिम साधूला ध्यानात बघितलेस, ते भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या शक्तीचाच विशेष प्रकारे प्रसार करतील. तू निंबवृक्षाखाली भूगर्भात तेवणारे चार नंदादीप बघितलेस, हा असाधारण योग आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी काही विशिष्ट उद्देशाने तुला तो अनुभव दिला असेल. त्याचे मर्म त्यांनाच माहीत. त्यांची लीला अगाध आहे. त्यात फार गूढ प्रयोजन असते. इतकेच नव्हे तर कुणाला न समजणारे, ते दैवी रहस्य पण असू शकते. हे एवढेच सांगण्यास त्यांची अनुमती होती. त्याचप्रमाणे मी हे। वर्णन केले आहे. समस्त सृष्टी श्रीपादांच्या नजरेत फिरत असते. त्यांच्या सारखे तेच, इतर कोणात्याही स्पष्ट मापदंडाच्या कक्षेत न येणारा हा विषय आहे. विश्व नियंत्याच्या विभूती योगसिद्ध, अमेय असतात.'' पळणी स्वामींचे स्पष्टीकरण ऐकून मी आनंद विभोर झालो. उडिपी क्षेत्रातून निघाल्यापासून कुरवपुरला पोहोचेपर्यंत अनेक चित्र विचित्र घटना घडत आहेत. हे सगळे अनुभव ग्रंथस्थ करावे, त्यासाठी गुरुची अनुमती मिळवावी. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनानंतर त्यांच्या चरणापाशी या विषयी प्रार्थना करावी असे मला वाटु लागले. .
श्री पळणी स्वामींनी माझ्या मनातले भाव अचूक ओळखले. ते म्हणाले “तुझ्या मनातले भाव मला कळले. भविष्यात भक्त जनांच्या हितार्थ त्यांचे चरित्र लिहावे असे .
श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामाचे वंशज व श्रीवासुदेवांचे संभाषण
माधव सांगू लागला. “महात्मा! मी ध्यानात कौपीनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले. ते अग्नीची व सूर्याची आराधना करीत होते. ते एका वेदपंडिताशी बोलत होते तुम्ही आत्ता मला दिलेले श्रीफळ (नारळ) मी एका मुस्लिम फकीराला देऊ इच्छितो. तो मुस्लिम फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थितीत आहे. ते माझ्या भावासमान आहेत. ते त्रिकालवेधी आहेत. तुमच्या जवळचे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ताम्रपत्र ग्रंथ मी घेतो. माझे अग्रज मानणाच्या मुस्लिम फकीरपाशी घेऊन जातो त्यांचे आशीर्वाद घेतो. यातले सर्व अंश यथार्थ आहेत का? यामध्ये थोडी स्वकल्पना आहे का? कितपत सत्य, कितपत असत्य? याबाबतचे निर्णय करु. निर्णय केल्यावर त्यावर विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिणार आहे' असे म्हणाले. .
ते वेदपंडित म्हणाले “अहो! मी दिलेले श्रीफळ तुम्ही त्या मुस्लिम फकीरला देऊ शकत नाही. तुमचा प्रयत्न फोल ठरणार. श्रीपाद श्रीवल्लभांच्या संकल्पाने चरितामृत ग्रंथ लिहून झालेला आहे. हा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ, महापुरुष, ऋषी, देवता महापवित्र मानतात. श्रीपाद प्रभुंच्या आज्ञेप्रमाणे हा ग्रंथ लिहिल्यामुळे त्यातले एकही अक्षर बदलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. अनेक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्याकडे आहे. जीर्ण प्रत गंगार्पण करण्याची आज्ञा श्रीपादांचीच आहे. अनेक पिढ्यांपासून आम्ही तो जपत आलो. श्रीपादांच्या आज्ञेविना कोणाही महान लोकांना या ग्रंथा विषयी आम्ही कळवणार नाही. तुम्ही त्यातले काही भाग बदलण्याच्या प्रयत्नात आहात. या ग्रंथावर हात ठेवले की श्रीपादांच्या चरण स्पर्शाची अनुभूती होणारे वंशज आम्ही आहोत. तुम्ही श्रीपादा पेक्षा महान असाल तर तुमची आज्ञा शिरोधार्यच ! तुम्ही संन्यास वेषधारी, आम्ही गृहस्थ. तुमचे न ऐकण्याचे साहस आम्ही करु शकत नाही. तुम्ही हे श्रीफळ धीशिलानगरीत पोहोचवू शकल्यास तो ताम्रपत्र ग्रंथ प्रत तुम्हाला सोपवून, मी यज्ञोपवीत त्याग करून स्वतःला चांडाल म्हणून घोषित करीन. तुम्ही सांगितलेल्या मुस्लिम फकीराला नंदादीपा विषयी माहीत असल्याचे सांगत आहात. ती धीशिलानगरी काही काळानी शीरधीनगरी होणार, असे सांगत आहात. आमच्या वंशात एका अवधूतांनी दत्तात्रेयाच्या अंशावताराला औरंगाबादमधे पाहिले. त्यांना धीशिलानगरी घेऊन जाणार, असे इतक्यातच सांगितले होते. तुम्ही पीठिकापूर येथे जाऊन, तेथे श्रीपादांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करु शकणार नाहीत. पीठिकापूर येथील अनेक लोक कलह, शुष्क वाद प्रतिवाद व कुतर्कातच वेळ घालवणारे आहेत. तेथे आध्यात्मिक तप्त जीव नाहीत. आमच्या पूर्वजांकडे तुम्ही पादुका प्रतिष्ठापना करु शकलात तर आनंदच होईल. पण त्यास श्रीपादांची कृपा हवी. श्रीवल्लभांच्या । संकल्पाविना झाडाचे पान देखील हलणार नाही. आमच्या वंशजांना मानवी कीर्ती, प्रतिष्ठा, मान-सन्मान नको. श्रीवल्लभ आमच्या घरी लहान मुलाच्या रूपात अदृश्यरूपात । वावरतात, हा आमचा विश्वास आहे.'' स्वामी! हेच मी ध्यानात पाहिले. .
तेंव्हा पळणी स्वामी म्हणाले “वत्सांनो ! हे वेदपंडीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामाच्या वंशातील आहेत व ते सर्व श्रीपादांना बालरुपातच पहातात. वंशातील लोकच नव्हे तर कोणीही-कुठल्याही-कुळ-जात-वंश-देश-युगाचे लोक, जे श्रीपाद श्रीवल्लभांना बालरुपात पाहून वात्सल्य भक्ती करतात, त्याच्याकडे श्रीपाद प्रभू बालरुपातच गुप्तपणे वावरतात. हा विषय साक्षात श्रीवल्लभांनी पिठापुरात सांगितलेला होता. श्रीचरण मामांच्या घरी जन्मले होते. त्या कुटुंबातले लोक, श्रीवल्लभ पिठापुरम्हून गेल्यावर काही वर्षांनी दुसरीकडे गेले. श्रीवल्लभांचे आई वडीलपण पीठिकापुरवासीच होते. त्यांचे वंशज पण तसेच गाव सोडून गेले. धीशिला नगरातील मुस्लिम फकीरात कालांतरानी श्रीपादांनी संपूर्ण शक्तिपात केला. वंगदेशात गदाधर महापुरुषाचा जन्म झाला. तो काळिकांबेच्या उपासनेने मोक्ष मागताच, त्याची इच्छा जगज्जननीनी मान्य केली. तुझ्या आश्रीत लोकांसाठी, त्यांच्या पापपुण्य हिशोबाप्रमाणे ‘अनुग्रहीत करण्यास तुम्हाला पुन्हा जन्मावे लागेल' असे देवी म्हणाली. त्यांनी देवीची आज्ञा स्वीकारली. तितक्यात देवीने धीशिला नगरच्या मुस्लिम फकीरला सूक्ष्मदेहाने यायला सांगितले. तो मुस्लिम फकीर तीन दिवसासाठी शरीर तिथेच टाकून भक्तांना मी अल्लाकडे जाऊन तीन दिवसात येतो असे सांगून आला.'' काळिकांबा दुसरे कोणी नसून बृहतशिलानगरीची वासवी कन्यकापरमेश्वरीच ! गदाधराच्या आश्रितांचे पापपुण्याचे हिशोब भार, त्या मुस्लिम फकीरला तिने दिला. जगज्जननीने आपले अंश त्या फकीरात निक्षिप्त केले. श्रीवल्लभांनी पण आपले अंश त्यांच्यात निक्षिप्त केले. त्या फकीराने पुन्हा तीन दिवसानी आपल्या स्थूल शरीरात प्रवेश केला, तेव्हा तो विशेष शक्तीवंत झाला. त्याचे निवास स्थान असलेल्या मशीदीची मातृभावाने सेवा करु लागला. त्याचे कारण जगन्मातेच्या अंशाचा त्यात प्रवेश झाला होता. त्यामुळेच तो भक्तांवर मातृवात्सल्याने प्रेम करू लागला. .
बेटा! हे सगळे येणा-या शतकात घडणार आहे. ध्यानातल्या वेदपंडिताचा जो स्नेहपात्र वैश्य होता, तो कौपीनधारी अवधूताला म्हणाला “स्वामी! आमचे आतिथ्य स्वीकारा. आम्ही आर्यवैश्य आहोत जगज्जननी श्री वासवी कन्यकांबा आमच्या कुळात जन्माला आली. तुम्ही स्वतः भोजन सामग्री(शिधा) स्वीकारा. वेदपंडित देखील वैश्यकुलोत्तमाचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना करु लागला पण कर्मठ ब्राह्मण यतीने भिक्षा स्वीकारण्याचा नकार दिला. श्रीवल्लभांना व श्री वासवी मातेला त्यांचा राग आला. त्यांनी त्या अवधूताचे जन्माहंकार कमी करण्यास शिक्षा ठरविली. अवधूत पीठिकापुरला पोहोचला. आचार व्यवहार, बाह्य पूजा विधानाला प्रामुख्य देणा-या पीठिकापुरच्या ब्राह्मणांनी अवधूताचे जोरदार स्वागत केले. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबांचे घर, तेंव्हा दुस-यांच्या ताब्यात होते. .
अवधुतांनी त्या यजमानांशी संपर्क साधून श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थानी श्री पादुका प्रतिष्ठेचा संकल्प केला व चांदीच्या पादुकाची विधीवत पद्धतीने प्रतिष्ठापना केली. मध्यरात्री एका चोराने त्या पादुका स्थानी प्रवेश केला. त्यावेळी घर मालक चोराला म्हणाला “अरे ! श्रीपाद श्रीवल्लभ अवतारावर माझा विश्वास नाही. या अवधूत स्वामीवर पण विश्वास नाही. तू या पादुका घेऊन जा व विकून आलेल्या रक्कमेत अर्धे मला दे. ते चोराला पटले व त्याने पादुकांची चोरी केली, .
दुस-या दिवशी पादुका दिसेनात, तेव्हा अवधूत खिन्न झाले. अवधूतांनी दुस-या पादुका तयार करुन त्याची प्रतिष्ठापना केली. पादुकांची पूजा, अर्चा त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. त्या रात्री अवधूतांनी त्या पादुकांजवळ बसुन दत्तस्त्रोतांचे पठण सुरु केले. त्या वेळेस त्या पादुका हवेत उडून अवधुताच्या डोक्यावर प्रहार करू लागल्या व तद्नंतर त्या गुप्त झाल्या व त्याचवेळेस श्री चरणांची वाणी ऐकू आली. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत होते “मी स्वतः गुप्त होऊन राहूशकतो तर पादुका गुप्त ठेऊ शकत नाही का? तुम्ही पाठविलेले श्रीफळ धीशिलानगरीस पोहोचले तर माझ्या मामांची शपथ खरी करावी लागेल. हे सर्व माझ्या इच्छे विरूध्द होत आहे त्यामुळे ते श्रीफळ वाटेतच खाल्ले गेले. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत तुला देण्याचे कारणच नाही. तू मला कोण समजलास? भोगी की योगी? मला सर्व सारखेच आहे. मी चांभार आहे, कातडे काढून चपला शिवतो. हीच माझी वृत्ति. तुझ्यासारख्या अहंका-याच्या चामड्याची चप्पल शिवली तर काहींच चुकणार नाही'' अशी गर्जना ऐकू आली अवधूत घाबरून थरथरू लागला. दुसरे दिवशी याच अवधूताचा सन्मान करणारे, सर्व पीठिकापूर वासी, त्या अवधूताला खोटा संन्यासी, पादुका चोर असे म्हणू लागले. अवधूताच्या उपस्थितीतच पादुका कशा अंतर्धान पावल्या असे प्रश्न विचारू लागले. यामुळे ते अवधूत अपमानीत होऊन पीठिकापूरातून निघून गेले. ही पुढे होणारी घटना आहे असे पळणी स्वामी म्हणाले. पळणीस्वामी पुढे म्हणाले, बेटा ! श्रीपादांच्या चरित्रात विश्वास न बसणा-या लीला असतात. त्यांच्या चरित्रावर शंकाकुशंका व्यक्त केली; तर ब्रह्मराक्षस जन्म प्राप्ती होते. चरितामृतावरील शंकेमुळे अवधूताची खरी बोली सुद्धा पीठिकापुरात शंकास्पद ठरली. .
माधव म्हणाला, “स्वामी ! मी सूक्ष्म देहानी पीठिकापुर येथे गेल्या विषयी सांगू का?'' त्यावर पळणी स्वामीनी होकार दिला. “मी सूक्ष्म देहानी पीठिकापुरात एका घरी पोहोचलो. एका स्थानी माझ्या समस्त शक्ती अदृश्य रूपातल्या दोन दिव्यपादुका आकर्षित करीत असलेले जाणवले. त्यापलीकडे मला काही कळेना. .
श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थानी श्रींच्या पादुका/श्रीपाद - श्रीदत्तात्रेय श्रीनृसिंह मूर्ती स्थापना
श्री पळणी स्वामी म्हणाले “बेटा माधवा तू दर्शन घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबांचे घर जे त्यांचे जन्मस्थान आहे. त्या माझ्या मातुल गृहात तू पाहिलेल्या पादुका प्रतिष्ठापीत होतील. माझ्या सुवर्ण फक्त माझ्या धर्मबद्ध कार्यक्रमाप्रमाणेच प्रतिष्ठित होतील. तू बसलेल्या व ध्यान केलेल्या ठिकाणी परमेश्वराची १०व्या ११व्या अवस्थेतीलश्रीपाद श्रीवल्लभ शक्तीस्वरुप व १२व्या अवस्थेतील श्री दत्तात्रेय शक्तीस्वरुप मूर्ती दिसतील.त्यानंतर त्या क्षेत्रात ब-याच लीला घडणार आहेत.'' एवढे बोलून पळणी स्वामी थोडावेळ मौन राहिले. नंतर त्यांनी गुहे जवळ गाडलेल्या १८ वर्षाच्या नवयुवकाचे शव बाहेर काढायला सांगितले. शव बाहेर काढल्यानंतर ते प्रणवोच्चार करु लागले. इतक्यात “श्रीपाद्राजं शरणं प्रपद्ये'' असा घोष करीत व्याघेश्वर शर्मा व्याघ्ररूपातच तिथे आले. श्री पळणी स्वामींनी त्या नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. पळणी स्वामींचे वृद्ध जीर्ण शरीर नदीत विसर्जित करण्यासाठी व्याघेश्वर घेऊन गेला. नवीन शरीरात प्रविष्ट झालेले पळणी स्वामी म्हणाले “आता तुम्ही दोघेही इथून निघून जा. बेटा माधवा तू तुझ्या विचित्रपुरला जा. तू सूक्ष्मरूपाने पीठिकापुरमच्या पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस, या जन्मापुरते तुला इतकेच पुरे. बेटा शंकरा तू तिरुपती पुण्यक्षेत्री जा. तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाचा लाभ मिळो.'' त्यांचा आशीर्वाद घेऊन माधव विचित्रपुराकडे व मी तिरुपतीकडे निघालो. खरोखर श्रीपादांच्या लीला अनंत आहेत, हेच खरे. .
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

Post a Comment

0 Comments