विशेष कामना धरूनखालील पद्धतीने श्रीदत्त—उपासना करावी.
१) सलग २१ दिवस दत्तमंदिरात जाऊन मनोभावे श्रीदत्तात्रेयाचे दर्शन घ्यावे.
२) दररोज श्रीदत्तमंदिरात जाऊन ७ किंवा साताच्या पटीत म्हणजे १४ , २१ वगैरे प्रदक्षिणा घालाव्यात.
३) श्रीदत्त स्तोत्राची २१ आवर्तने दररोज करावीत.
४) श्रीगुरूगीतेचा दररोज एक पाठ करावा.
५) आकस्मिक संकट आल्यास घोरात्कष्टास्तोत्राचे ७—१४—२१ पाठ करून श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तींपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून लावावा.
६) २१—४२— १२१ दिवस श्रीदत्तात्रेयांच्या विशिष्ट मंत्राचा अथवा " ॐ श्रीम र्हीम क्लीम ग्लौम द्राम " या प्रभावी मंत्राचा जप करावा.
७) १६ गुरवारचे व्रत करावे.दर गुरवारी सायंकाळी श्रीदत्तात्रेयाची षोडपोचार पूजा करावी व उपास सोडावा.सोळाव्या गुरवारी तिन मेहूण घालून व्रताची सांगता करावी.
८) विशेष संकल्प धरून श्री गुरू चरित्र सप्ताह करावा.
९) सुख समृद्धी साठी श्रीपाद राजम शरणं प्रपदये हा रोज 11 माळा जप 40 दिवस करा.
0 Comments