मानवी जन्म

मानवी जीवनात प्रत्येकाला भक्ती करावी असे वाटते पण ती घडत मात्र नाही याला कारण माया*.
*नामस्मरणानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते. माया तरुण जाण्यासाठी नामस्मरण हा रामबाण उपाय आहे. विषयाची उर्मी हे मायेचे लक्षण होय. नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय*.
*मानवी जीवनात प्रपंच करत असतांना परमार्थ साधायचा असेल तर सर्वांत सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामाचा महिमा ज्ञानेश्वर, तुकाराम, यांचे बरोबर अनेक संतानी सांगितलेला आहे आणि आजही सांगत आहे. ते आत्मसात करून आपण ते नियमितपणे घेत जावे.*
*मानवी जीवनात मनुष्य केंव्हा सुखी होतो, जेव्हां शरीराच्या सुखासाठी ज्यागोष्टी लागतात त्या मिळाल्या म्हणजे मनुष्य सुखी होतो अशी आपली प्रत्येकाची खोटी समजूत आहे. त्यापेक्षा मनाला आवडणाऱ्या गोष्टी जमा केल्या तर मनुष्य सदैव आनंदी राहतो व ईश्वर कायमचे मनात ठाण मांडून बसतो. रिकामा वेळ भगवंताचे नामस्मरणात घालवावा. म्हणजे त्यापासून मिळणार समाधानाचे लक्षण आनंदच असतो.

Post a Comment

0 Comments